VFX चा छोटासा इतिहास..
- Omkar Mangesh Datt

- Mar 16, 2020
- 3 min read
Updated: Mar 18, 2020
आजच्या सिनेमामध्ये व्हिज्युअल इफेक्ट्सचा फार मोठा वाटा असतो.. अशक्य अशक्य गोष्टी या स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने सिनेमा मध्ये करताना आपण बघतो.. केबलिंग च्या सहाय्याने स्टंट होतात आणि नंतर केबल काढून टाकल्या जातात.. ग्रीन क्रोमा वापरला जातो.. असे कित्येक स्टंट आपल्याला पूर्वीच्या सिनेमांमध्येही पहायला मिळतात.. आपल्याला तेव्हा प्रश्न पडतो की हे लोग इतक्या कमी साधनांच्या मदतीने इतक्या कठिण गोष्टी.. इतके भव्य सेट्स त्या काळात कसे उभारत असतील.. जिवाच्या करारावर स्टंट कसे करत असतील.. नो डाउट की ते सिनेमा करताना जिवाची बाजी लावायचे पण प्रत्येक जादुगारा प्रमाणे त्यांच्याकडेही त्यांच्या काही ट्रिक्स होत्या.. त्या ट्रिक्स म्हणजेच त्या काळचे व्हिज्युअल इफेक्ट्स.. थोडंस विज्ञान.. कैमराचं उत्तम ज्ञान... आणि खुपसारी हुशारी याच्या मदतीने त्या काळचे लोग भन्नाट व्हिज्युअल्स तयार करायचे.. VFX ची खरी सुरवात केली जादुगारांनी.. विचित्र फोटोज किंवा छोट्या छोट्या फिल्म्स मधले चमत्कार उभे करताना त्यांनी कित्येक ट्रिक्स जन्माला घातल्या आणि पुढे सिनेमा बनावणार्यानी त्याच विज्ञानाचा वापर करून पडद्यावर चमत्कार केले.. या ट्रिक्स तशा सोप्या होत्या पण त्या काळच्या लोकांसाठी अद्भुत चमत्काराहुन कमी नव्हत्या..
प्रस्प्रेक्टीव्ह सोबत खेळ
एकमेकां शेजारच्या दोन गोष्टी पाहताना आपला मेंदू त्यांच्यातल अंतर लांबी आणि इतर डायमेंशनचा पड़ताळ घेवु लागतो.. २ डी सिनेमाच्या पडद्यावर मेंदूला याच बाबतीत ट्रिक करण्याची हातोटी काही सिनेमा मेकर्सनी आत्मसाद केली होती.. आपल्याला हव्या असणार्या बैकग्राउंड समोर बरेचदा कैमरामध्ये दिसणार आहे तेवढाच सेट लावला जायचा.. आणि कैमरा असा सेट केला जायचा की आपल्याला मेंदूला सिनेमा मेकरला हवा तसा प्रस्प्रेक्टीव्ह दिसेल.. उंच इमारतीला लटकणे, उंचावरच्या खिडकीतुन उडी मारणे अशी दृश्य बर्याचदा अशा प्रकारे शूट केलि जायची.. पाहणार्याला वाटायचं की माणूस खुप उंचावरुन पडला आहे.. पण खरं तर तो अवघ्या काही फुटा वरुन खाली पडून फ्रेम आउट झालेला असायचा..
काचेवर चित्रकारी
ही ट्रिक मोठे मोठे सेट्स उभारताना वापरली जायची.. कैमरा आणि समोरचा सेट याच्या मधोमध एक पारदर्शक काच ठेवली जायची.. एखादा उत्तम आर्टिस्ट दिग्दर्शकाच्या अपेक्षेनुसार दृश्य त्या काचेवर रेखाटायचा.. खर्या सेट्सचा भाग आणि काचेवरचं चित्र बेमालूमपणे एकमेकांत सामावून जाइल याची काळजी घेतली जायची.. कलाकारांना वावरायची जागा चित्रकार सोडायचा आणि झालं.. न्यूट्रल फोकसवर कैमेरामन ते दृश्य शूट करायचा.. फायनल सिनमध्ये काच, सेट, कलाकार असं सगळ एकत्रितपणे पडद्यावर दिसायच आणि हवा तो परिणाम साधला जायचा.. याचा फिल्मसाठी वापर केल्याचं सगळ्यात जूनं उदहारण सापडतं ते १९०७ साली.. नॉर्मन डौन नावाच्या एका दिग्दर्शकाने त्याच्या मिशन्स ऑफ़ कैलिफोर्निया नावाच्या सिनेमात या ट्रिकचा वापर केला होता.. तो जिथे शूट करत होता तिथल्या बर्याच इमारती तुटक्या फुटक्या अवस्थेत होत्या.. त्याने योग्य परिणाम साधण्यासाठी त्यांचे मिसिंग पिस काचेवर चितारले होते.. काही ठिकाणी टेलीफोनचे पोल्स लपवायलाही त्याने या ट्रिकचा वापर केला होता.. त्याने तेव्हा ही ट्रिक जाहिर केली होती आणि पुढे पेटंट सुद्धा करायला गेला होता.. पण कोर्टात त्याचा अर्ज मंजूर झाला नाही..
फिल्म एक्सपोज
फिल्मवर म्हणजे नेगेटिव्ह वर शूट करण्यामागच विज्ञान खुप साधं आहे.. बेसिक शब्दात सांगायचं तर कैमराच्या लेंस मधून फिल्म वर जिथे प्रकाश पडतो तो भाग एक्सपोज होतो म्हणजे त्यावर दृश्य छापल जातं.. म्हणून तुम्ही अर्धी फिल्म झाकलीत (मास्क केलीत) तर फक्त तिच्यावरच दृश्य छापल जाणार.. बाकीच्या फिल्मवर नाही.. आणि गम्मत अशी आहे की ती फिल्म रिवाइंड करुन तिचा उरलेला अर्धा भाग (आधी एक्सपोज झालेला अर्धा झाकून) तुम्ही शूट केलात तर त्यावर वेगळ दुर्श्य चित्रित होऊ शकतं.. याचा वापर करुन फिल्म मेकर्सनी अनेक चमत्कार पडद्यावर केले.. भिंतीत गायब होणारा माणूस.. डोकं नसलेल धड.. एकाच व्यक्तीच्या चेहर्यावर एक डोळा एकीकडे तर दूसरा दूसरीकड़े फिरवण.. हवेत गोष्टी उड़वण.. अशक्य ठिकाणाहून गाड्या चालवण आणि सगळ्यात फेमस वापर म्हणजे डबल रोल.. हिंदी सिनेमाने तर या गोष्टीचा पुरेपुर वापर केलेला आपण पाहिला आहे.. म्हणूनच जुन्या सिनेमांमध्ये दोन जुळ्या भावांना एका फ्रेम मध्ये दाखवताना त्यांच्यात नेहमी खुप अंतर ठेवलं जायचं आणि नीट पाहिलं तर दिसायची त्यांच्या मधोमध जाणारी एक पुसट काळी रेघ.. (मास्किंगमधल्या डीफरन्सचा परिणाम..) परदेशात तर हे मास्किंग अगदी प्रीसाईज करुन फिल्म मेकर्सनी तेव्हा एक मुलगी आपल्या सारख्याच दिसणार्या दुसर्या मुलीच्या गालावर चुम्बन देते अशी दृश्य तयार केली होती..
रिवर्स ही ट्रिक अगदीच साधी आहे.. आपण मोबाइल मध्येही वापरतो आजकाल.. कुठलही दुर्श्य शूट करायचं आणि ते उलट्या क्रमात (रिवर्स) प्ले करायचं.. पण फिल्ममेकर्स याचा अगदी योग्य ठिकाणी वापर करुन लोकांना पूर्वीपासून चकित करत आले आहेत.. फेकलेली गोष्ट हातात येणे, फुटलेली गोष्ट जोडली जाणे असे चमत्कार तर लोकांनी दाखवले पण १९२३ सालच्या मुळ टेन कमांडमेंटस मध्ये समुद्र दुभंगतो ते ऐतिहासिक दृश्य सुद्धा याच ट्रिकचा वापर करुन चित्रित केलं होतं..
अशा अनेक ट्रिक्सच्या शोधात फिल्म मेकर्स आजही असतात.. काहीही झालं तरी हे जादुई जग आहे.. इथल्या जादू खर्या वाटतील.. लोकांना चकित करतील.. गोष्टीचा परिणाम साधतील आणि लोकांच मनोरंजन करतील यासाठी सुरु झालेला कैमरा ट्रिक्सचा प्रवास आज एक भल्यामोठ्या आणि खर्चिक VFX इंडस्ट्रीपर्यन्त येउन पोहोचला आहे.. यातच सगळ आलच..
Video Credit: Pedro Cinemaxunga





Comments